वाकड, पुणे: वाकड येथील “स्पा लाईट स्पा” मध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटवर छापा टाकून पोलिसांनी व्यवस्थापक आणि मालकाला अटक केली आहे. पोलिसांनी व्यवस्थापक विशाल लहू बल्लाळ (वय २४, रा. डांगे चौक, वाकड) आणि मालक अजित गोरख घोलप (वय ३५, रा. चौधरवाडी, फलटण, सातारा) यांना ताब्यात घेतले आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्पा लाईट स्पा येथे वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला वेश्यागमनासाठी पाठवले. इशारा मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि व्यवस्थापक विशाल बल्लाळ हा मुलीकडून वेश्या व्यवसाय करवून घेताना आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड करीत आहेत.





