हिंजवडी, पुणे: आयटी पार्क हिंजवडी जवळील सूसरोडवरील वेस्टर्न हॉटेल अँड लॉजिंगमध्ये तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सहा जणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपयांची रोकड आणि इतर साहित्य असा एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या हॉटेलचा संबंध सत्ताधारी पक्षातील एका प्रमुख नेत्याशी आहे, ज्याबद्दल चर्चा आहे की ते आगामी विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरणार आहेत.







