सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ची लक्झरी मर्सिडीज कारने गोल्फ क्लब चौक, येरवडा येथे दुपारी १:३० वाजता एका कुरिअर बॉयला चिरडले. अपघातात कुरिअर बॉयचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव केदार चव्हाण (वय ४१, राहणार पद्मावती) आहे. पोलिसांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, चव्हाण कुरिअर कंपनीत काम करतात. ते मंगळवारी दुपारी स्वारगेट येथून कुरिअर घेण्यासाठी जात होते आणि ते विमानतळावर नेण्याच्या तयारीत होते.
दुपारी एक ते सव्वा एकच्या सुमारास, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ची लक्झरी मर्सिडीज कार गोल्फ क्लबच्या गेटमधून बाहेर पडली. त्यावेळी, या कारने चव्हाण चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांना तात्काळ पोलिसांनी उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवले.

ससून रुग्णालयात दाखल होताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मर्सिडीज चालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांचे रक्त नमुने देखील घेतले आहेत.
R.I.P – Kedar Chavan (age 41, Resident of Padmavati)





