Home Breaking News जनतेचा आशीर्वादच खरी ताकद; घराघरात पोहोचताना मिळतोय भरभरून प्रतिसाद – सुनील अण्णा...

जनतेचा आशीर्वादच खरी ताकद; घराघरात पोहोचताना मिळतोय भरभरून प्रतिसाद – सुनील अण्णा शेळके

पिंपरी-चिंचवड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील प्रत्येक सोसायटी, प्रत्येक गल्लीत आणि घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधताना मिळणारा विश्वास आणि आशीर्वाद हीच आमची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन सुनील अण्णा शेळके यांनी केले. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि उत्साह पाहता विकासाच्या मुद्द्यांवर मतदार ठामपणे उभे राहत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
सुनील अण्णा शेळके म्हणाले की, आजचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना केवळ घोषणा नकोत, तर रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शिक्षण, सुरक्षितता आणि पारदर्शक कारभार या. विकासात्मक मुद्द्यांवर ठोस काम हवे आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे उमेदवार कटिबद्ध असून, याच विश्वासावर नागरिक आमच्यावर भरभरून प्रेम दाखवत आहेत.
प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि व्यापारी वर्गाकडून मिळणारा पाठिंबा हा आमच्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी सांगितले. “प्रभागाच्या विकासासाठी आम्ही नेहमीच नागरिकांसोबत उभे राहिलो आहोत आणि पुढील काळातही प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर राहू,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सुनील अण्णा शेळके यांनी विश्वास व्यक्त केला की, विकासाच्या बाजूने उभे राहणारे सुज्ञ मतदार आपल्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करतील. येणारी निवडणूक ही केवळ उमेदवारांची नाही, तर प्रभागाच्या उज्ज्वल भवितव्याची निवडणूक असून, नागरिकांचा विश्वास आणि आशीर्वादच या विजयाची गुरुकिल्ली ठरेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.