Home Breaking News ‘हा शब्द ठाकरेंचा!’ – महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांशी थेट संवाद, मुंबईच्या भविष्यासाठी आराखडा...

‘हा शब्द ठाकरेंचा!’ – महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांशी थेट संवाद, मुंबईच्या भविष्यासाठी आराखडा सादर

मुंबई : “हा शब्द ठाकरेंचा…!” असे ठामपणे सांगत आज आदित्य ठाकरे आणि मी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उमेदवारांशी सविस्तर संवाद साधला. हा संवाद केवळ निवडणुकीच्या तयारीपुरता मर्यादित नव्हता, तर मुंबईकरांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ठोस आराखड्याचे सादरीकरण होते.
या बैठकीत मुंबईच्या विकासाचे व्हिजन, नागरिकांच्या मूलभूत समस्या, पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षआणिण  स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली. उमेदवारांना जनतेशी थेट संवाद साधण्याचे, त्यांच्या प्रश्नांना ऐकून घेण्याचे आणि त्यावर ठोस उपाययोजना मांडण्याचे आवाहन करण्यात आले.
नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही लढाई केवळ सत्तेसाठी नाही, तर मुंबईकरांचा स्वाभिमान, हक्क आणि भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आहे. “मुंबई कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही; ही मुंबईकरांची आहे,” असा ठाम संदेश या संवादातून देण्यात आला. यावेळी उमेदवारांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. अनेकांनी आपल्या प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या संधी मांडल्या. आगामी निवडणूक ही जनतेच्या विश्वासावर आणि कामगिरीवर लढवली जाणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
या संवादामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली असून, येत्या काळात मुंबईच्या राजकीय रणांगणात आक्रमक प्रचार, ठोस मुद्दे आणि मुंबईकेंद्रित विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.