Home Breaking News राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; प्रभाग क्र. ९ मधून अधिकृत उमेदवारी—अजितदादा पवार यांच्या...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश; प्रभाग क्र. ९ मधून अधिकृत उमेदवारी—अजितदादा पवार यांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार

50
0
माझ्यासारख्या सामान्य पण सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत संधी दिल्याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. आज औपचारिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पक्षाने प्रभाग क्रमांक ९ मधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली. हा क्षण केवळ राजकीय प्रवेशाचा नसून जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी आमचे मेव्हणे आमदार श्री. माऊली आबा कटके यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि पाठिंब्याने पुढील वाटचाल अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास हा जबाबदारीचा सन्मान असून, प्रभागातील मूलभूत प्रश्न, नागरी सुविधा, पायाभूत विकास, युवक-महिलांचे सशक्तीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाभिमुख विचारधारा, सामाजिक न्यायाची बांधिलकी आणि सर्वसमावेशक प्रगतीचा अजेंडा यांमुळेच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. येत्या काळात जनतेशी थेट संवाद, पारदर्शक कारभार आणि कामातून विश्वास निर्माण करत प्रभाग क्रमांक ९ मध्ये ठोस बदल घडवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.