पिंपरी : लोकशाहीची खरी ताकद ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. मतदान हा केवळ हक्क नसून लोकशाहीप्रती आपले कर्तव्य आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून त्याच्या माध्यमातून नागरिक आपल्या शहराच्या आणि प्रशासनाच्या भवितव्याची दिशा ठरवतात. त्यामुळे कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले.





