पुणे शहरातील कुख्यात टिपू पठाण टोळीविरोधात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत पाहिजे असलेल्या दोन फरारी आरोपींना जेरबंद केले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-५, पुणे शहर यांनी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी केली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार शहरातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखांवर नमूद असलेल्या फरारी व पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत होती. त्याच अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-५ चे पथक सक्रियपणे काम करत होते.
काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२५ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोका) अंतर्गत कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) लागू आहेत. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी
-
साजीद झिब्राइल नदाफ (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर)
-
इरफान नासीर शेख (वय २७, रा. सय्यदनगर, हडपसर)
हे परराज्यातून पुण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.





