Home Breaking News पुणे पोलिसांची मोठी कामगिरी; दोन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुखरूप सुटका, दोन आरोपी...

पुणे पोलिसांची मोठी कामगिरी; दोन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुखरूप सुटका, दोन आरोपी अटकेत

51
0
पुणे | प्रतिनिधी :- काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण आणि तांत्रिक तपास करत दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतले असून, पीडित मुलींची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी
काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४९०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ६४, ६५(१), ६९, ७१, ९६, १३७(२), ३(५) तसेच पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याने ही बाब गांभीर्याने घेत पोलिसांनी तपासाला वेग दिला.
तांत्रिक तपास आणि ३३०० किमीचा थरारक प्रवास
तपासादरम्यान संशयितांचे मोबाईल क्रमांक हाती लागल्यानंतर त्याचे सखोल तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने वापी, सुरत, अहमदाबाद (गुजरात) तसेच फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली आणि जोधपूर (राजस्थान) अशा अनेक ठिकाणी तब्बल ३३०० किलोमीटरचा प्रवास करून शोधमोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान
🔹 एक अल्पवयीन मुलगी ता. राणी, राजस्थान येथे
🔹 दुसरी अल्पवयीन मुलगी जि. पाली, राजस्थान येथे
सापडली. दोन्ही मुलींना सुखरूप ताब्यात घेऊन सुरक्षित करण्यात आले.
आरोपी अटकेत
या प्रकरणात अल्पवयीन मुलींना फुस लावणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे :
1️⃣ सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१), रा. राणी, राजस्थान
2️⃣ सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय ३१), रा. राणी, राजस्थान
दोन्ही आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही उल्लेखनीय कामगिरी
मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील,
मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,
पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर,
सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती नम्रता देसाई व श्री. राजेंद्र मुळीक
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पथकाचे विशेष कौतुक
ही कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मानसिंग पाटील,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अजय हंचाटे,
पोलीस अंमलदार शाहीद शेख, महादेव शिंदे,
तसेच गुन्हे शाखा युनिट-५ मधील शशिकांत नाळे व गणेश माने
यांच्या पथकाने यशस्वीपणे केली.