चिंचवड : मोरया गोसावी समाधी संजीवन सोहळ्याच्या ४६४ व्या महोत्सवाच्या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात इथेनॉल मॅन म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांना मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञान, उद्योग, सामाजिक कार्य आणि अध्यात्मिक मूल्यांची सांगड घालत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे करण्यात आला.
या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांनी दिलेला ठाम आणि मनाला भिडणारा संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. समाजातील वाढती असहिष्णुता, स्पर्धेचे विषारी स्वरूप, कुटुंबातील संवादाचा अभाव आणि मूल्यांचे होत जाणारे क्षरण पाहता शिक्षणसंस्थांनी ‘पुस्तकी ज्ञानापेक्षा माणूस घडवण्यावर’ भर देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अभय फिरोदिया यांचा सडेतोड इशारा — “माणूस कमकुवत, तंत्रज्ञान मजबूत होतंय… हीच खरी धोक्याची घंटा”
फिरोदिया म्हणाले—
🔹 “शाळांमध्ये गुणांची शर्यत आहे; पण मूल्यांची शर्यत कुठे आहे?”
🔹 “आज माणूस अधिक चिडखोर, अस्थिर आणि असंवेदनशील दिसतो. घराघरात संवाद नाही, ही मोठी सामाजिक शोकांतिका आहे.”
🔹 “मुलांच्या हितासाठी शिक्षकांनी लावलेली शिस्त पालक चुकीच्या नजरेतून पाहतात. समाजाच्या घडणीला ही प्रवृत्ती अपायकारक आहे.”
त्यांच्या प्रभावी भाषणावेळी संपूर्ण सभागृह शांत बसले होते. अनेकांनी ही चर्चा “आजच्या काळासाठी अत्यंत आवश्यक” असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ. प्रमोद चौधरी यांचा संदेश — “अध्यात्म, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी हीच माणसाची खरी संपत्ती”
पुरस्कार स्वीकारताना डॉ. चौधरी म्हणाले—
🔸 “उद्योग आणि शिक्षण एकत्र येऊन समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात.”
🔸 “व्यक्तीची दृष्टी व्यापक झाली तर परिवर्तन आपोआप सुरू होते.”
🔸 “कुटुंब, समाज आणि शिक्षणसंस्था—या तिन्ही पातळ्यांवर संतुलनाची गरज आहे.”
त्यांनी तरुणांसाठी ‘समज, शिस्त आणि साधना’ हे तीन जीवनसूत्र सांगितले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, पर्यावरणीय आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्तकर्ते—
-
वेदमूर्ती मंदार शहरकर
-
मोरेश्वर पेंडसे
-
विनायक वाबळे
-
भाऊ खासनीस – (मोरया महाराज पालखी वाहक)
-
जीवन जोशी व प्रल्हाद जोशी – (वेदशाळा)
-
डॉ. मोहन भालचंद्र देव
-
अपर्णा धनंजय कुलकर्णी
-
चैतन्य बेणारे – (Iron Man)
-
श्रेया संदीप धाडगे – (वायूसेना)
-
गजलक्ष्मी ढोल ताशा पथक
-
गतीराम रघुनाथ भोईर
-
स्मिता मुकुंद सातव
-
तेजस्विनी साठे – (कथक)
-
निशा रसाळ
-
उमेश भगवान वाघेला – (वन्यजीव अभ्यासक)
-
यशवंत रंगनाथ देशपांडे
-
तानाजी श्यामराव शिंदे
-
ॲड. सुभाष गायकवाड
-
ॲड. हरिश्चंद्र सुरवसे
-
देवेंद्र सुर्वे
यापैकी तानाजी शिंदे यांनी धर्मजागृतीत भेटलेल्या संघर्षांबद्दल सांगताना सर्वांना अंतर्मुख केले.
कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्यात उपस्थित—
-
मंदार महाराज देव
-
जितेंद्र देव
-
ॲड. राजेंद्र उमाप
-
ॲड. देवराज डहाळे
-
केशव विद्वांस
-
माजी महापौर अपर्णा डोके
-
विजय उर्फ शीतल शिंदे
-
अश्विनी चिंचवडे
-
विठ्ठल भोईर
-
मोरेश्वर शेडगे






