पुणे : मोबाईलच्या वाढत्या व्यसनातून मुक्तता मिळवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये निरोगी डिजिटल शिस्त निर्माण करण्यासाठी नू. म. वि. मराठी शाळेत जागतिक डिजिटल डिटॉक्स दिनाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत योग, प्राणायाम आणि पुस्तक वाचन करून ‘मोबाईलचा वापर कमी करण्याची’ सामूहिक शपथ घेतली.
हा उपक्रम पाहण्यासाठी पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या पटांगणात “चला आपण डिजिटल डिटॉक्स होऊया आणि बालपणाचा खरा आनंद लुटूया” असा अर्थपूर्ण संदेश देणारे आकर्षक भव्य पोस्टर लावण्यात आले होते. विद्यार्थी त्या पोस्टरभोवती एकत्र येत शपथ घेताना पाहून अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटले.
योग-प्राणायामाने दिली दिवसाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी एकत्रित योगासन आणि प्राणायामाने केली. प्राणायाम करताना मुलांनी मोठ्या आवाजात सकारात्मक घोषणा दिल्या —
“मोबाईल नाही, माझी शक्ती मीच!”
“जगूया निसर्गात, वाचूया पुस्तकात!”
या घोषणांनी संपूर्ण पटांगणात सकारात्मक ऊर्जा पसरली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक परिणामांची माहिती दिली.
डिजिटल डिटॉक्सची सामूहिक शपथ
९ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की —
-
अभ्यासाशिवाय मोबाईलचा वापर कमीत कमी करणार
-
भोजन, झोप आणि शाळेच्या वेळेत मोबाईलपासून दूर राहणार
-
पुस्तक वाचन, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना प्राधान्य देणार
-
पालक आणि शिक्षकांसोबत संवाद वाढवणार
ही शपथ घेताना मुलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
सामाजिक संस्थांचा पुढाकार
हा उपक्रम साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
सुरुवातीस साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शाह यांनी डिजिटल डिटॉक्सचे तात्पर्य विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. मुलांशी जिव्हाळ्याने संवाद साधताना त्यांनी सांगितले—
“मोबाईल आपल्या हातात आहे, पण जीवन हातातून निसटू देऊ नका.”
वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सच्या संस्थापक रेखा चौधरी यांनी डिजिटल व्यसनाचे धोके सांगत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदस्या वैशाली चव्हाण यांनी मुलांना “डिजिटल ब्रेक घ्या, स्वतःला वेळ द्या” असा संदेश दिला.
मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर—
-
पियूष शाह — अध्यक्ष, साईनाथ मंडळ ट्रस्ट
-
प्रल्हाद भाऊ थोरात — श्री शिवाजी मित्र मंडळ
-
गंधाली शाह
-
विजय चव्हाण
-
गोविंदा वरंदाणी
-
अमित भाऊ पळसकर — श्री कडबे आळी मंडळ
-
पराग ठाकूर — शाळा समिती अध्यक्ष
-
मुख्याध्यापिका — अनुजा कांगणे
-
प्राचार्य प्रकाश कांबळे
-
शिक्षिका वर्षा साबळे, नितीन शेंडे






