Home Breaking News ‘स्वदेशी वैद्यकीय क्षमतांसह भारताची झेप – महेश किसनराव लांडगे यांनी मांडला भक्कम...

‘स्वदेशी वैद्यकीय क्षमतांसह भारताची झेप – महेश किसनराव लांडगे यांनी मांडला भक्कम विकास-अहवाल’

पिंपरी-चिंचवडमध्ये वैद्यकीय तंत्रज्ञान, मेडिकलक्टेक बाजारपेठ आणि भारतातील वाढती स्वदेशी क्षमता या विषयांवर आधारित एक प्रभावी माहितीपर पोस्टर प्रकाशित करण्यात आले. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी कामांचा आढावा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
या पोस्टरमध्ये सांगण्यात आले आहे की—भारत हा जगातील टॉप 20 मेडिकलक्टेक बाजारपेठांमध्ये आता ठामपणे उभा आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योग क्षेत्रांचा मजबूत पाया भारताला वैद्यकीय साधनसामग्री उत्पादनात जागतिक स्पर्धेत अग्रस्थानी पोहोचवत आहे.
तसेच भारत हा आशियातील चौथा सर्वात मोठा वैद्यकीय उपकरण बाजारपेठ बनला असून, अनेक राज्यांमध्ये सुरु असलेल्या मेडिकल डिव्हाइस पार्कमुळे देशाला तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रात गगनभरारी घेण्याची संधी मिळत आहे. या पार्कमुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळत असून आयात अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे.
पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश किसनराव लांडगे यांनी या पोस्टरमार्फत लोकांपर्यंत संदेश पोहोचवला की,
“तुमची आमची भाजप सर्वांची” ही घोषणा केवळ राजकीय नाही तर विकासाच्या कार्यावर आधारित आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात वैद्यकीय, तांत्रिक आणि स्टार्टअप संस्कृती बळकट करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.
महेश लांडगे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमध्ये मजबूत आरोग्यसेवा, आधुनिक रुग्णालये आणि तंत्रज्ञान आधारित सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट भाजप सरकारचे आहे.
पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलेल्या उपक्रमांमुळे स्थानिक युवांसाठी रोजगार, संशोधनाच्या संधी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य वाढणार आहे. वैद्यकीय साधनसामग्रीच्या ‘मेड इन इंडिया’ क्रांतीचे केंद्रबिंदू म्हणून महाराष्ट्राचे नाव ठळकपणे पुढे येत आहे.