पुण्यातील रात्रीच्या घरफोड्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा, युनिट-४ ने एक महत्वपूर्ण कारवाई करत घरफोडी करणारा कुख्यात आरोपी बब्लू चौगुले याला पकडण्यात मोठे यश मिळवले आहे. या आरोपीकडून ₹2,67,200 किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे चंदननगर परिसरातील अनेक अनसॉल्व्ह घरफोडी प्रकरणांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुप्त बातमीमुळे पोलिसांची धडधडीत तयारी
युनिट-४ चे पथक विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नियमित गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चंदननगर परिसरात सतत घरफोड्या करणारा बबल्या उर्फ बब्लू चौगुले खडकी भागात चोरीतील सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर पथकाने होळकर ब्रिज परिसरात सापळा लावला, आणि काही वेळातच काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवर संशयित युवक येताना दिसला.
अटक — ओळख पटवली आणि चौकशी सुरू
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने स्वतःची ओळख रुतीक ऊर्फ बब्लू संजय चौगुले (वय २१), रा. आळंदी रोड, फुलेनगर, विश्रांतवाडी, पुणे अशी सांगितली. चौकशी वेगाने सुरू झाली आणि आरोपीच्या ताब्यातून सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत विचारणा केली असता बब्लूने धक्कादायक कबुली दिली की, 10 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे त्याने दोन साथीदारांच्या मदतीने घरफोडी करून दागिने चोरले होते.
₹2.67 लाखांचे सोन्याचे दागिने आणि स्प्लेंडर मोटारसायकल जप्त
त्यानंतर पथकाने आरोपीकडून एकूण:
-
₹2,67,200 किमतीचे सोन्याचे दागिने
-
एक स्प्लेंडर मोटारसायकल





