पुणे शहरातील चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर शेवटी पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. औदुंबर उर्फ मोन्या रविंद्र नाकते (वय 29 वर्षे, रा. जनवाडी, गोखलेनगर) हा परिसरातील सराईत आणि मनमानी वर्तन करणारा गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या अभिलेखावर कुख्यात आहे.
मोन्या नाकते आणि त्याच्या साथीदारांनी चतुःश्रृंगी, हिंजवडी आणि वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, जीवघेण्या शस्त्रांसह हिंसक हल्ले, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची मालिका घडवून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. मागील पाच वर्षांत त्याच्याविरोधात तब्बल सहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या कृत्यांमुळे नागरिक उघडपणे तक्रार देण्यासही घाबरत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडे आलेल्या प्रस्तावांची काटेकोर पडताळणी करून, पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांनी मोन्या नाकते याच्यावर एम.पी.डी.ए. (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कठोर कारवाई केली.
आदेश क्रमांक:
-
पीसीवी/डीईटी/चतुःश्रृंगी/नाकते/943/2025 दि. 20/11/2025
-
पीसीबी/स्थानबद्ध/चतुःश्रृंगी/नाकते/944/2025 दि. 20/11/2025
याअधींयमांतर्गत मोन्या नाकतेला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यांचे गुन्हेगार आणि व्हिडिओ पायरेट्स यांच्या विघातक कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा वापरला जातो.
या कारवाईमुळे चतुःश्रृंगी, गोखलेनगर व आसपासच्या परिसरात दिलासा मिळाला असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे स्वागत केले आहे. गुन्हेगारीला आळा बसावा आणि परिसराची शांतता पुन्हा प्रस्थापित व्हावी, यासाठी पोलिसांनी घेतलेली ही पावले अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत.
ही कारवाई पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली—
-
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार
-
मा. सहपोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा
-
मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग श्री. मनोज पाटील
-
मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे
-
मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग श्री. विठ्ठल दबडे





