कळेपाडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगारांच्या धाडसी टोळीवर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ०३ रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून ०४ गावठी पिस्तुलं आणि ०५ जिवंत काडतुसे अशी मोठी शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली असून अंदाजे रु. 2,42,000/- चा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. या टोळीमुळे परिसरात गुन्हेगारी वाढू शकते, अशी शक्यता वर्तविली जात होती. वेळेवर केलेल्या कारवाईमुळे पोलीसांनी मोठा गुन्हा टळल्याचे सांगितले.
🔹 गुप्त माहिती मिळताच कारवाईची सुरूवात
कळेपाडळ पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की पलसबीड रोड, पालस बस्ती मार्ग, महेंन्द्रवाडी परिसरात काही संशयित इसम अवैध हत्यारांसह येणार आहेत. पोलिसांना मिळालेली माहिती अत्यंत विश्वासार्ह असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव व पथकाने संबंधित ठिकाणी पाळत ठेवून आरोपींच्या हालचालींची खात्री केली आणि योजना आखून त्यांना शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले.
🔹 पकडले गेलेले आरोपी व जप्त साहित्य
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची माहिती पुढीलप्रमाणे —
⦿ 1) आसिफ सभीक तेली
वय – २१ वर्षे
रा. गल्ली नं. १५, सय्यदनगर, हडपसर, पुणे
⦿ 2) यश सुभाष मदने
वय – २० वर्षे
रा. भोसलेनगर, कलवाड, बारामती, पुणे
⦿ 3) प्रथमेश संदीप लोंढे
वय – २४ वर्षे
रा. बडवण निवासी, नीरा रोड, बारामती, पुणे
जप्त साहित्य
-
०४ गावठी पिस्तुलं
-
०५ जिवंत काडतुसे
-
विविध वस्तू मिळून एकूण मुद्देमाल: ₹2,42,000/-





