Home Breaking News वाघोलीत संतापाचा उद्रेक! महापालिका आयुक्तांची गाडी नागरिकांनी केली अडवणूक

वाघोलीत संतापाचा उद्रेक! महापालिका आयुक्तांची गाडी नागरिकांनी केली अडवणूक

117
0
पुणे : वाघोली परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष नागरिकांना आता असह्य झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून आज नागरिकांनी संताप व्यक्त करत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या गाडीला अडवून निषेध नोंदवला.
वाघोली परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि पावसाळ्यात साचणारे पाणी या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. नागरिकांनी अनेकदा तक्रारी दाखल करूनही काहीच उपाययोजना न झाल्याने आज त्यांनी थेट आयुक्तांच्या वाहनासमोर येत आपला संताप व्यक्त केला.
नागरिकांचा आरोप आहे की, “महापालिकेने वाघोलीला शहरात समाविष्ट करून अनेक आश्वासने दिली होती, मात्र आजही परिस्थिती ग्रामीण भागासारखीच आहे. विकासकामांचा मागमूसही नाही.”
या घटनेमुळे वाघोलीतील प्रशासन आणि नागरिकांमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
स्थानिक सामाजिक संघटनांनीही प्रशासनावर तीव्र टीका करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांचा इशारा आहे की, “जर लवकरच मूलभूत सुविधांची सोय झाली नाही, तर पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”