Home Breaking News ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ-5 मध्ये महत्त्वाची बैठक पार पडली

ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ-5 मध्ये महत्त्वाची बैठक पार पडली

78
0
पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सण उत्सव शांततेत, सुसंवादाने आणि सुरक्षिततेत पार पडावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत परिमंडळ-5 कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला परिमंडळ-5 मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी तसेच ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे 70 ते 80 जण या बैठकीत सहभागी झाले. बैठकीत सणादरम्यान येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. मिरवणूक मार्गातील अडथळे, वाहतूक व्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला.
अधिकाऱ्यांनी शासन व वरिष्ठ कार्यालयाकडून दिलेल्या सूचना सर्व उपस्थितांपर्यंत पोहोचवल्या. यामध्ये विशेषतः शांततेचे वातावरण राखणे, नागरिकांना गैरसोय होऊ न देणे, मिरवणूक शिस्तबद्धपणे काढणे आणि वाहतुकीत अडथळा न आणणे या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
बैठकीत मौलाना, ट्रस्टी आणि पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. परस्पर संवादातून सण उत्सव अधिक आनंददायी व शांततेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
 ही बैठक पोलिस प्रशासन आणि समाजातील धार्मिक व सामाजिक प्रतिनिधी यांच्यातील सुसंवाद आणि समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली. ईद-ए-मिलाद सण शांततेत साजरा करण्यासाठी परिमंडळ-5 मध्ये मौलाना, ट्रस्टी व पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत बैठक