बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हिंदू समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गणेश चतुर्थी साजरी करण्यावर काँग्रेस सरकारने बंदी आणली असून, याविरोधात संतापाचा ज्वालामुखी उफाळून आला आहे. अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले गणेशोत्सव मंडप पोलिसांच्या मदतीने तोडण्यात आले. बेंगळुरूमधील एका भागात भक्तांनी उभारलेला गणेशाचा पंडाल पोलिसांनी जबरदस्तीने उखडून टाकल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
हिंदू भाविकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “गणेश चतुर्थीसारख्या आपल्या सनातन परंपरेतील महत्त्वाच्या उत्सवावरच बंदी का?” गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि संपूर्ण देशात मोठ्या श्रद्धा-भावनेने साजरा होतो. मात्र, काँग्रेस सरकारच्या या निर्णयाने धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
या प्रकरणावरून राज्यभरात निषेधाचे स्वर उठू लागले आहेत. अनेक हिंदू संघटनांनी काँग्रेस सरकारला लक्ष्य करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भक्तांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न झाल्यास संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
गणेश भक्तांचे म्हणणे आहे की, गणपती बाप्पा हा एकता, संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. अशा वेळी त्याच्या उत्सवावरच बंदी घालणे म्हणजे हिंदू संस्कृतीवर थेट आघात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आता कर्नाटकात हा विषय राजकीय व धार्मिक वादाचा केंद्रबिंदू ठरत असून, पुढील काही दिवसांत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.