नवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्रावर गंभीर प्रश्न उपस्थित करत SSC शिक्षिका नीतू सिंह यांनी मोदी सरकारवर थेट टीका केली आहे. “भारताची एज्युकेशन सिस्टीम सध्या धोक्यात आहे. प्रत्येक वेळी हिंदू-मुस्लिमच्या नावाखाली खरे मुद्दे दाबले जात आहेत. शेतकरी, जवान, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा आवाज दाबून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे,” असे स्पष्ट वक्तव्य नीतू मॅडम यांनी केले.
त्यांनी सांगितले की, देशाच्या प्रगतीसाठी शिक्षणव्यवस्था मजबूत असणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या धोरणांमुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्र मागे पडत आहे. बेरोजगारी, शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांच्या समस्या, अभ्यासक्रमातील सुधारणा यावर गंभीरपणे काम करण्याऐवजी सरकार भावनिक विषय पुढे करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवते, अशी टीकाही त्यांनी केली.
नीतू मॅडम यांच्या या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा दर्शवला असून, सरकारने आता खऱ्या प्रश्नांवर उत्तर द्यावे अशी मागणी केली जात आहे.
त्यांच्या वक्तव्याने शैक्षणिक क्षेत्रातील नाराजी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे आणि ‘शिक्षकांचा आवाज’ आता आणखी बुलंद होण्याची शक्यता आहे.