Home Breaking News रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडले – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला धागा

रहस्यमय मृत्यूचे गूढ उलगडले – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला धागा

42
0
मुंबई : गोरेगाव ओबेरॉय स्क्वेअर कॉम्प्लेक्समध्ये 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या 17 वर्षीय प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. 23व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर या मृत्यूचे गूढ उलगडले असून, हा प्रकार आत्महत्या नसून दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही तरुणी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती आणि पुढील उच्च शिक्षणासाठी लंडनला जाणार होती. तिच्या राहण्याची व्यवस्था तसेच महाविद्यालयीन प्रवेश आधीच निश्चित झाला होता. घरच्यांनी केलेल्या तयारीमुळे ती अतिशय उत्साही होती. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं.
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली की, मुलगी तिच्या आईसाठी संगणकाचा पासवर्ड लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. खिडकीलगतच्या भिंतीवर तिने पेन्सिलने लिहिलेला अर्धवट पासवर्ड पोलिसांना आढळून आला. पोलिसांच्या मते, ती पासवर्ड लिहिताना खिडकीबाहेर झुकली आणि तोल गेल्याने ती थेट खाली कोसळली.
 या घटनेमुळे पालकांमध्ये मोठा प्रश्न उभा राहिला आहे – मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्कता आवश्यक आहे. तांत्रिक गोष्टी शिकवताना किंवा अशा संवेदनशील गोष्टी लिहून ठेवताना सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे.
स्थानिक नागरिक या घटनेमुळे स्तब्ध झाले असून, “एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला” अशी भावना व्यक्त केली जात आहे. मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीचा मृत्यू – भिंतीवरचा अर्धवट पासवर्ड ठरला अपघाती मृत्यूचा धागा