Home Breaking News पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणेकरांनो लक्ष द्या! कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

48
0

पुणे | १९ ऑगस्ट २०२५, रात्री ८:३० :- पुणे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कासारसाई धरण ९९.२९% भरलेले असून, धरण व्यवस्थापनाने पाणीसाठा नियंत्रणासाठी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या धरणातून १४८० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे, मात्र आज रात्री १० वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून १७७६ क्युसेक्स केला जाणार आहे. पाऊस कायम राहिल्यास किंवा पाणलोट क्षेत्रात येवा वाढल्यास विसर्गात आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

महत्त्वाच्या सूचना:

नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये.

नदीपात्रात ठेवलेले जनावरे किंवा साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे.

सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.

पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधावा.

इंजिनिअर दि. म. डुबल, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग यांनी सर्व नागरिकांना योग्य ती खबरदारी व दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुठा नदी आधीच दुथडी भरून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अधिक सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे.

“कासारसाई धरणाचा विसर्ग वाढणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा – पाटबंधारे विभागाचा महत्त्वाचा निर्णय”