चारोली बुद्रुक परिसरातील दाभाडे वस्तीमध्ये बिबट्या मादी आणि तिची दोन बछडी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
वनविभागाचे अधिकारी श्री. ई. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी श्री. अनिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने ट्रॅप कॅमेरे व यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, जेणेकरून बिबट्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येईल.
सदर बिबट्यांचे लवकरात लवकर सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी वनविभाग सज्ज असून, कोणत्याही प्रकारचा धोका टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने उपाययोजना केल्या जात आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, लहान मुलांना व वृद्धांना संध्याकाळी किंवा रात्री घराबाहेर फिरण्यासाठी परवानगी देऊ नये, तसेच वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
श्री. श्रीनाथ चव्हाण आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे हे मिशन अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे.
वनविभाग आणि प्रशासन आपली सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.