Home Breaking News मुंबई हार्बर मार्गावर रात्रीचा मेगाब्लॉक! प्रवाशांना होणार त्रास, वेळापत्रकात मोठे बदल, वेलंकणीसाठी...

मुंबई हार्बर मार्गावर रात्रीचा मेगाब्लॉक! प्रवाशांना होणार त्रास, वेळापत्रकात मोठे बदल, वेलंकणीसाठी विशेष गाड्याही जाहीर

मुंबईकर प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर वाशी स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम सुरू करण्यासाठी ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ दरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत अप आणि डाउन मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आले आहेत.
या ब्लॉकदरम्यान सिग्नलिंगच्या अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक कामांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो. रात्री प्रवास करणाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
🔹 ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान अंशतः रद्द होणाऱ्या लोकल –
रात्री ८.५४ बेलापूर-सीएसएमटी लोकल वाशी येथे रद्द
रात्री ९.१६ बेलापूर-सीएसएमटी लोकल वडाळा येथे रद्द
रात्री १०.०० वांद्रे-सीएसएमटी लोकल वडाळा येथे रद्द
रात्री १०.५० व ११.३२ पनवेल-वाशी लोकल नेरूळ येथे रद्द
🔹 ७ व ८ ऑगस्टसाठी बदल –
पहाटे ५.१० ची सीएसएमटी-गोरेगाव लोकल वडाळा रोड येथून सुरू होईल
🔹 ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान पूर्ण रद्द –
सीएसएमटी-वाशी लोकल – रात्री ९.५०, १०.१४, १०.३०
वाशी-सीएसएमटी लोकल – पहाटे ४.०३ आणि ४.२५
दरम्यान, वेलंकणी उत्सवासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे ते वेलंकणी दरम्यान चार विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. गाडी क्र. ०९०९३/०९०९४ ही सेवा २७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान चालणार आहे. या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून भाविकांनी लवकर आरक्षण करून ठेवावे.
तसेच एक धक्कादायक घटना भिवंडी येथे घडली आहे. मेट्रो-५ मार्गिकेच्या कामादरम्यान लोखंडी सळई वरून खाली पडून ती थेट एका रिक्षात बसलेल्या प्रवाशाच्या डोक्यात घुसली. हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्लक्षित घटनेमुळे एमएमआरडीएने कंत्राटदारावर ५० लाखांचा व सल्लागारावर ५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई हार्बर मार्गावर ३ दिवस रात्रकालीन ब्लॉक; प्रवाशांना नियोजन आवश्यक!
 वाशी स्थानकात इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंगचं काम; लोकल सेवांवर परिणाम
 मेट्रो प्रकल्पातील अपघातामुळे कंत्राटदारावर दंड
 वेलंकणी यात्रेसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू