पुणे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्य प्रकाशन समारंभ प्रसंगी अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. यावेळी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.





