पुणे, काळेपडळ पोलीस स्टेशन: दुचाकी टायर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली असून, त्याच्याकडून ₹३,५३,१७५/- किमतीचे नवीन दुचाकी टायर, चोरीसाठी वापरलेली रिक्षा आणि कटावणी जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा तपशील:
काळेपडळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २८९/२०२५ अंतर्गत भादंवि कलम ३०५, ३३१(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पुणे शहरातील विविध भागांतील टायर दुकाने हे या चोरट्याचे लक्ष्य होते. त्याने पहाटेच्या वेळी कटावणीच्या साहाय्याने दुकाने फोडून दुचाकींचे टायर चोरण्याचा धंदा सुरू केला होता.





