Home Breaking News वाहन चोरीतील बालकाचा पर्दाफाश; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कामगिरी – चार दुचाकी...

वाहन चोरीतील बालकाचा पर्दाफाश; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कामगिरी – चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस; विधीसंघर्षीत बालकाकडून जप्ती

103
0
पुणे – पुणे शहरातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी चोख नजर ठेवत तपास अधिक तीव्र केला असून, याच प्रयत्नांतून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी कामगिरी केली आहे. फक्त अल्पवयीन असूनही गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेल्या एका विधीसंघर्षीत बालकाकडून तब्बल चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. संशयित बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, सिंहगड रोड व नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चार चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग उघडकीस आला.
या तपासादरम्यान खालील गुन्हे निष्पन्न झाले:
गुन्हा रजि. क्र. 345/2025 – भारती विद्यापीठ
गुन्हा रजि. क्र. 347/2025 – भारती विद्यापीठ
एक गुन्हा – सिंहगड रोड पोलीस स्टेशन
एक गुन्हा – नांदेड सिटी पोलीस स्टेशन
या कारवाईतून चार दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली असून, गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. सदर बालकाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कामगिरीचे पोलीस आयुक्तालय पुणे व पश्चिम विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त), श्री. मिलींद मोहीते (पोलीस उपायुक्त), श्री. राहुल आवारे (सहाय्यक पोलीस आयुक्त) यांनी विशेष कौतुक केले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, व अंमलदार मंगेश गायकवाड, किरण साबळे, दिनेश टपके, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी व सागर बोरगे यांच्या अथक प्रयत्नातून शक्य झाली.
ही घटना म्हणजेच अल्पवयीन गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पालकत्वाच्या जबाबदारीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करते. पोलिसांनी वेळेवर केलेल्या या कामगिरीमुळे वाहनमालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.