Home Breaking News उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा राजीनामा; महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा राजीनामा; महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता

107
0
नवी दिल्ली : देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी रात्री उशिरा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी प्रकृती ठीक नसल्याचे कारण पुढे करत आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. रात्री साधारणतः १० वाजता त्यांनी आपला राजीनामा सादर केला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यावर स्वाक्षरी करणार की नाही, याची अधिकृत घोषणा काही तासांत होण्याची शक्यता आहे.
या नाट्यमय घडामोडींनंतर देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी नवे नाव कोणते असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेले हरीभाऊ बागडे यांचे नाव सर्वांत आघाडीवर असल्याचे समजते. त्यांच्या राजकीय अनुभवाची आणि शिस्तप्रिय नेतृत्वशैलीची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते.
हरीभाऊ बागडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत २०१४ ते २०१९ या कालखंडात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी कार्य केले आहे. त्याआधी १९९५ ते १९९९ दरम्यान ते राज्याचे मंत्रीही होते. अलीकडेच, २७ जुलै २०२४ रोजी त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या नावाचा विचार राष्ट्रपती पदाच्या दृष्टीने होणे, ही महाराष्ट्रासाठी सुद्धा गौरवाची बाब ठरणार आहे.
याशिवाय तमिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही नावे चर्चेत असून, अंतिम निर्णय कुणावर होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या constitutional पदासाठी नव्या चेहऱ्याची निवड करताना सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यातील राजकीय समीकरणं देखील महत्त्वाची भूमिका बजावतील. सध्या सत्ताधाऱ्यांकडे असलेले बहुमत पाहता, त्यांच्या पसंतीस पडणारा उमेदवार निवडून येण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे. उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांचा अचानक राजीनामा; महाराष्ट्राचे हरीभाऊ बागडे आघाडीवर?