Home Breaking News शिवसेनेच्या निष्ठेची प्रेरणा बाळासाहेबांकडूनच मिळाली – अंबादास दानवे यांची भावनिक प्रतिक्रिया

शिवसेनेच्या निष्ठेची प्रेरणा बाळासाहेबांकडूनच मिळाली – अंबादास दानवे यांची भावनिक प्रतिक्रिया

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील आपली टर्म संपत असताना दिलेल्या वक्तव्यात अत्यंत भावनिक आणि ठाम भूमिका मांडली आहे. “मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे. मी इथे येणार नसलो तरी माझ्या बाकीच्या मॅचेस चालू राहतील,” असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसेनेप्रतीची निष्ठा अधोरेखित केली.
दानवे यांनी सांगितले की, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला २००० साली बोलावले होते. शहरप्रमुख पदासाठी मुलाखत घेऊन २००४ मध्ये मला निवडले गेले. बाळासाहेबांनी त्या वेळी एक वाक्य सांगितले – ‘मी शिवसेना सोडली तरी तुम्ही शिवसेना सोडू नका. माझेही राहू नका, शिवसेनेचे राहा.’ हेच आमच्या रक्तात रुजले आहे.”
आपल्या ४४ दिवस उरलेल्या कार्यकाळाचा उल्लेख करत दानवे म्हणाले, “या उर्वरित काळात दुनिया इकडची तिकडे होऊ शकते. मी सुमारे १००० पेक्षा अधिक दिवस विरोधी पक्षनेते म्हणून कार्य केले असून, त्यामध्ये ४३१ दिवस महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांचा दौरा केला आणि अडीच लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “ही खुर्ची नव्हे, ही जबाबदारी आहे. शिवसेना प्रमुखांनी अन्यायाविरोधात तलवार उचलायला शिकवले आणि आम्ही त्यांच्या शिकवणीप्रमाणेच महाराष्ट्राच्या हितासाठी कार्य केले आहे.”
भावनिक ठेवा, निष्ठावान संदेश – अंबादास दानवे यांची शिवसेनेच्या निष्ठेवर ठाम भूमिका
🔸 “मी बाळासाहेबांचा नाही, शिवसेनेचा आहे”
🔸 “टर्म संपत आली, पण निष्ठा संपणार नाही”
🔸 “४४ दिवस उरले, पण अजून अनेक लढती बाकी आहेत”