पिंपरी चिंचवड | १६ जुलै २०२५ – शहरातील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वाकडमधील डांगे चौक ते भुमकर चौक या ४५ मीटर रुंदीच्या नियोजित रस्त्यावर अडथळा ठरत असलेल्या ९६ झोपड्यांवर काल महापालिकेने मोठी निष्कासन कारवाई केली.
कारवाईचे तपशील:
▪️ काळाखडक झोपडपट्टीत २५० मीटर लांबी व १६ मीटर रुंदीच्या क्षेत्रावर ही कारवाई ▪️ सुमारे ४६ हजार चौरस फूट क्षेत्रफळातील झोपड्या, टपऱ्या, दुकाने निष्कासित ▪️ १ पोकलेन, ७ जेसीबी, ४ डंपर आणि १५ मजुरांची टीम मैदानात उतरली ▪️ आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहिम पार
पुढील टप्पा: रस्ता रुंदीकरण सुरू
▪️ अतिक्रमण हटवल्यानंतर तातडीने रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू ▪️ विद्युत खांब, जलवाहिन्या, अन्य सेवा वाहिन्यांचे स्थलांतर लवकरच ▪️ वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजनबद्ध आणि गतीमान अंमलबजावणी
नागरिकांना होणारे फायदे:
▪️ डांगे चौक – भुमकर चौक वाहतूक कोंडीपासून मुक्तता ▪️ थेरगाव, हिंजवडी, पिंपरी या भागातील नागरिकांना दिलासा ▪️ आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका यांना होणार सहज प्रवेश ▪️ भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन दीर्घकालीन दृष्टीने योजना
महत्त्वपूर्ण वक्तव्ये:
“शहराच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कठोर भूमिका घेण्यात येत आहे.” – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
“सर्व क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत की, अशा अतिक्रमणांची तत्काळ कारवाई करून विकास प्रकल्पांना गती द्यावी.” – प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त
कारवाई दरम्यान महत्त्वाची उपस्थिती:
▪️ मकरंद निकम, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, अतुल पाटील, अमित पंडित ▪️ DCP विशाल गायकवाड, ACP विशाल हिरे, PI जितेंद्र माळी ▪️ स्थापत्य व नगररचना विभाग, BRTS, विद्युत व अतिक्रमण विभागांचा समन्वय