Home Breaking News सोमाटणे-वारसोळी टोलनाके प्रकरणावर विधानसभा हादरली! सुनिल शेळके यांनी उपस्थित केला मुद्दा; दादा...

सोमाटणे-वारसोळी टोलनाके प्रकरणावर विधानसभा हादरली! सुनिल शेळके यांनी उपस्थित केला मुद्दा; दादा भुसे यांचे चौकशीचे आदेश

मुंबई, १६ जुलै २०२५ – मुंबई विधानसभेत आज मावळच्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा झाली. आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी सोमाटणे आणि वारसोळी टोलनाक्यांतील अनियमितता, वाहतूक कोंडी, नागरिकांच्या मनस्तापाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत सरकारचे लक्ष वेधले. यावर मंत्री दादा भुसे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले.
 मुख्य मुद्दे:
▪️ सोमाटणे व वारसोळी टोलनाक्यांमधील अंतर फक्त ३१ किमी, नियमांनुसार किमान ६० किमी असणे अपेक्षित
▪️ आरबीकडून कामात निष्काळजीपणा असूनही जबाबदारी त्यांच्याकडेच
▪️ एमएसआरडीसी पूर्णपणे निष्क्रिय, देखरेख नाही, प्रतिसाद नाही
▪️ तळेगावपासून स्ट्रीटलाईट ४ वर्षांपासून बंद, रस्ते पूर्णपणे अंधारात
▪️ नागरिकांच्या तक्रारी असूनही अनेक वर्षे दुर्लक्ष
▪️ रस्त्यांची डागडुजी २०२०-३० कालावधीत फक्त एकदाच अपेक्षित होती, तीही झालेली नाही
▪️ वाहनांच्या रांगा, वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास
 विधानसभेत सरकारने दिले आश्वासन:
▪️ चौकशीचे आदेश देण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
▪️ टोल वसुलीतील मनमानी आणि सुविधा अभावाच्या मुद्द्यांवर सरकार गंभीर
▪️ मावळकरांच्या तक्रारींना आता शासनस्तरावर मान्यता
 सुनिल अण्णा शेळके म्हणाले:
“मावळच्या जनतेला रस्त्यावरून प्रवास करताना टोलनाक्याच्या नावाखाली लुटले जात आहे. ना रस्त्यांची डागडुजी, ना स्ट्रीटलाईट, आणि वर मनमानी टोलवसुली – हे सहन केलं जाणार नाही!”
 नागरिकांचा आवाज पोहोचला विधानसभेत!
या मुद्द्यामुळे मावळ तालुक्यातील नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या दीर्घकालीन तक्रारींना अखेर विधानसभेचा आधार मिळाला असून, आता कारवाई होणार की केवळ चौकशीच्या नावाखाली वेळ मारून नेला जाणार? – हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.