मुंबई, १६ जुलै २०२५ – महाराष्ट्रातील सागरी क्षेत्राच्या समृद्धीचा नवा अध्याय सुरू करत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र मेरीटाईम समिट 2025’ चे उद्घाटन दिमाखात पार पडले. या कार्यक्रमास सागरी व बंदर विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनाचे ठळक मुद्दे –
▪️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ११.१५ वाजता उद्घाटन ▪️ नितेश राणे यांचा सागरी धोरणांवर ठाम मांडणी ▪️ देशी-विदेशी उद्योग प्रतिनिधी, सागरी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांची मोठी उपस्थिती ▪️ “महाराष्ट्र सागरी क्षेत्रात देशात अग्रेसर राहील,” – फडणवीस यांचा आत्मविश्वास
मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्राच्या ७२० किमी सागरी किनाऱ्याचा विकास हा केवळ पर्यटन वा वाहतूकपुरता मर्यादित नसून, तो राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा ठरणार आहे.”
यावेळी सागरी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे घोषणाही करण्यात आल्या:
ग्रीन पोर्ट्स,
सागरी वाहतूक व लॉजिस्टिक हब,
मत्स्य व्यवसायासाठी आधुनिक सुविधा,
तरुणांसाठी सागरी उद्योजकतेस चालना देणारी धोरणं
मंत्री नितेश राणे म्हणाले, “आम्ही पायाभूत सुविधांपासून ते जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या समावेशापर्यंत एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे.”
हा समिट केवळ सागरी धोरणांची चर्चा नसून, प्रत्यक्ष गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा सागरी ठसा अधोरेखित करण्याची संधी ठरतो आहे.