Home Breaking News पुण्यात मोठी कारवाई: सिंहगड रोडवर परराज्यातील मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारी महिला एजंट...

पुण्यात मोठी कारवाई: सिंहगड रोडवर परराज्यातील मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणारी महिला एजंट अटकेत!

87
0
सिंहगड रोड, पुणे
पुणे शहरात मानव तस्करी व वेश्या व्यवसायावर कडक कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी एक मोठी कारवाई करत परराज्यातील मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या महिला एजंटला अटक केली आहे. या कारवाईत एका पीडित परराज्यातील महिलेची सुटका करण्यात आली आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई:
पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सपना राजाराम कदम (वय ३६, रा. ता. तुळजापूर, उस्मानाबाद) ही महिला एजंट मुंबई-बंगळुरू हायवे लगत सिंहगड रोडवरील एका हॉटेलमध्ये ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी परराज्यातील मुली पुरवत होती.
ती मुलींचे फोटो पाठवून ऑनलाईन माध्यमातून सौदे करत असे आणि प्रत्येकी ४ हजार रुपये ग्राहकांकडून वसूल करून, त्यांना हॉटेलमध्ये वेश्या गमनासाठी पाठवत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती ही महिला मागील काही महिन्यांपासून सक्रिय होती.
छाप्यातील कारवाई:
विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत
▪️ एक पीडित परराज्यातील मुलगी ताब्यात घेण्यात आली
▪️ सपना कदमसह तिचे ३ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल
▪️ गु.र.नं. ३४१/२०२५, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कारवाई
नेतृत्व आणि मार्गदर्शन:
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त विवेक मासाळ आणि सह पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पो.नि. प्रशांत अन्नछत्रे, सहा. पो.नि. अनिल सुरवसे तसेच पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सचिन माळवे, संदिप शिर्के, विपुन गायकवाड, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, स्वप्नील मिसाळ यांनी परिश्रम घेतले.
मानव तस्करी आणि लैंगिक शोषणविरोधातील कठोर कारवाईचे उदाहरण:
पोलिसांची ही कारवाई फक्त एका गटाचा पर्दाफाश नाही, तर स्त्री शोषण आणि देहव्यापाराच्या दलदलीत अडकवणाऱ्या टोळ्यांविरोधातील कठोर संदेश आहे. या प्रकारांवर कडक नजर ठेवून पुणे पोलिसांचा गुप्तचर यंत्रणा अधिक सजग झाल्याचे यातून स्पष्ट होते.