Home Breaking News पावसाळी अधिवेशन २०२५ – आठवडा २, दिवस २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पावसाळी अधिवेशन २०२५ – आठवडा २, दिवस २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान भवनात सकाळी आगमन!

मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी १०.४५ वाजता विधान भवनात दाखल झाले. मुंबईतील विधान भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आजच्या दिवशी महत्त्वाचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता असून, अनेक विरोधी पक्षनेत्यांनी शेतकरी कर्जमाफी, महागाई, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि बेरोजगारी यावर चर्चा करण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच मीडिया प्रतिनिधींमध्येही उत्सुकता वाढली. आज विधीमंडळात विविध समित्यांचे अहवाल सादर होणार असून, काही महत्त्वाचे आर्थिक प्रस्ताव व योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला ‘मराठा आरक्षण’, ‘ओबीसी राजकीय आरक्षण’, तसेच ‘मेट्रो प्रकल्पातील रखडलेले काम’ यावर देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.