पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये मोठी पोलिस कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिला बॉर्डर पार करून भारतात आलेल्या असून, त्यानंतर पुण्यात वेश्या व्यवसाय करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
ही कारवाई पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर करण्यात आली. त्यांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. याअंतर्गत फरासखाना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. प्रशांत भस्मे यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे तपास व अॅन्टी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटचे पथक बुधवार पेठेतील आशा बिल्डिंग, ढमढेरे गल्ली येथे धडकले.
ही धाड कारवाई दि. २ जुलै २०२५ रोजी पहाटे करण्यात आली. या ठिकाणी अचानक पोलीसांनी छापा टाकून ८ महिलांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता त्या महिलांनी बांगलादेशमधून बॉर्डर ओलांडून पश्चिम बंगालमार्गे भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. त्यांनी भारतात कोणताही अधिकृत परवाना न घेताच पुण्यात वेश्या व्यवसाय सुरू केला होता.
या महिलांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
-
अंजुरा बेगम (वय ४०, जि. जोशोर, बांगलादेश)
-
खदीजा बेगम (वय २७, जि. जोशोर, बांगलादेश)
-
पारोल बेगम (वय ३८, जि. खुलना, बांगलादेश)
-
तंजीला बेगम (वय ४०, जि. खुलना, बांगलादेश)
-
रुपाली बेगम (वय ३८, जि. खुलना, बांगलादेश)
-
मन्सुरा रफिक (वय १९, जि. नारायणगंज, बांगलादेश)
-
सिमा शेख (वय ४५, जि. खुलना, बांगलादेश)
-
रिना खातून (वय ३२, जि. नरैल, बांगलादेश)





