दौंडमध्ये वारकऱ्यांवर भीषण अत्याचार : चहा पित असताना चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार; संशयितांचा स्केच जाहीर, माहिती असल्यास संपर्क साधा! तुमची माहिती कुणाचं आयुष्य वाचवू शकते – कृपया मदत करा!
स्वामी चिंचोली परिसर, पुणे-सोलापूर महामार्ग घटना दिनांक : ३० जून २०२५ | सकाळी
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात वारकऱ्यांच्या गाडीत घुसून दोन नराधमांनी लूटमार व एका अल्पवयीन मुलीवर चहाच्या टपरीमागे लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
घटनेचा तपशील : पंढरपूर वारीसाठी निघालेल्या एका भजनमंडळाच्या गाडीत स्वामी चिंचोली येथील चहा पिण्याकरिता थांबलेले काही भाविक विश्रांती घेत असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी गाडीत घुसून कोयत्याचा धाक दाखवत हल्ला केला. त्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून गोंधळ उडवला, महिलांचे दागिने लुटले आणि अल्पवयीन मुलीवर अमानुष प्रकार केला. पोलीसांनी त्वरित गुन्हा दाखल करत कलम 64, 309(6), 351(2), 3(5) नुसार तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जाहीर : पुणे ग्रामीण पोलीसांकडून संशयित आरोपींचा स्केच (रेखाचित्र) प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यांच्या अटकेसाठी १० विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन : जर कोणी स्केचमधील व्यक्तींना ओळखत असेल, अथवा यासंदर्भात काही माहिती असेल तर खालील अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा. आपली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार आहे.
पोलिस संपर्क क्रमांक :
श्री. बापूराव दडस (SDPO) – 9049664673
श्री. राहुल गवडे (API) – 9823165080
श्री. दत्ताजी मोहिते (API) – 8308844004
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत जोरदार मागणी : या प्रकरणावर आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत आवाज उठवून, आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, त्यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती गृहमंत्र्यांकडे केली आहे.
पोलीस तपासाची दिशा :
पोलीसांनी वेगवेगळ्या कोनातून तपास सुरू केला आहे.
वाऱ्यावर आलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक तैनात
CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन आणि साक्षीदारांच्या जबाबांची मदत घेतली जात आहे