पुणे शहरातील हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ₹३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चारचाकी आणि मोटारसायकल असा मोठा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने नक्की नियोजन करून, बनावट नंबर प्लेटसह वाहन वापरून घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनाक्रम:
दि. १४ जून २०२५ रोजी फिर्यादी आपल्या कुटुंबासह तुळजापूर-अक्कलकोट येथे गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात घुसून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तपासाची दिशादर्शक कामगिरी:
डॉ. राजकुमार शिंदे (उपायुक्त, परिमंडळ ५) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, पोनि श्री. निलेश जगदाळे, व तपास पथकाने हडपसर, पुणे ग्रामीण व शहरी भागातील ८०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपी लवळे परिसरात गेले असल्याचा ठावठिकाणा मिळाला. तिथून पुढे तपास करत गणेश अर्जुन पुरी (वय ३३), रविसिंग शामसिंग कल्याणी (वय २७), व निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी (वय ४४) यांना अटक करण्यात आली.
गाडीचा वापर आणि बनावट नंबर प्लेटचा प्रकार:
आरोपींनी गुन्ह्याकरिता टाटा नेक्सॉन गाडीचा वापर केला.
सदर गाडी भावाने विकत घेतली होती पण नावावर नव्हती.
बनावट RTO नंबर लावून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.
उघडकीस आलेले गुन्हे:
हडपसर पोलीस ठाणे: गु.र.नं ५७०/२०२५ व ५६९/२०२५
कोरेगाव पार्क पोलीस ठाणे: गु.र.नं ५८/२०२५
सीडको पोलीस ठाणे, संभाजीनगर: गु.र.नं ४४/२०२५
जप्त मुद्देमाल:
सोन्या-चांदीचे दागिने – ₹२२,५०,०००/-
टाटा नेक्सॉन गाडी – ₹१४,००,०००/-
हंटर मोटारसायकल – ₹५०,०००/- एकूण जप्त माल – ₹३७,००,०००/-
ही कामगिरी पार पाडणारे अधिकारी व पथक:
मा. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग)
ही कामगिरी पुणे पोलिस दलाच्या सुसंघटित तपास आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे. बनावट नंबर प्लेटसह अचूक नियोजन करणाऱ्या चोरट्यांवर यशस्वी कारवाई करून, पोलिसांनी शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा दिला आहे.