पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात १५ ते २० चारचाकी वाहनांची आणि एका दुकानाची अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. ही घटना शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली होती. मात्र गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपींना जेरबंद करून नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित केला आहे.
ही घटना दिनांक २८ जून २०२५ रोजी सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात घडली. येथे स्थित ‘अनलिमिटेड (V-Mart)’ नावाच्या दुकानासह १५ ते २० चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३२२/२०२५ नुसार भारतीय दंड विधान कलम १८९(२), १९०, १९१(२)(३), १३१, ३५१(२)(३), ३२४(२), आर्म अॅक्ट ४, २५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोपनीय माहिती व सीसीटीव्ही तपासातून आरोपी जाळ्यात सदर गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार खालील आरोपींना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले – 1️⃣ प्रथमेश मणुनाथ सौसुध्दी (२४) – रा. माया अपा., वडगाव बु. 2️⃣ सुजय सतीश चव्हाण (१९) – रा. वसंतनगर, कोथरूड 3️⃣ श्रेयस नंदकुमार भागवत (१८) – रा. माया अपा., वडगाव बु. 4️⃣ एक विधी संघर्षग्रस्त बालक – यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
👮 दहशतीच्या वातावरणात दिलासा देणारी कामगिरी ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) श्री. विवेक मासाळ, तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यशस्वी तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, तसेच मधुकर तुपसौंदर, पंढरीनाथ शिंदे, मुंकुद तारू, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, हनिफ शेख, अमोल काटकर, अतुल साठे, योगेश झेंडे, पुरुषोत्तम गुन्ला, तुषार किंद्रे, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे यांचा मोलाचा सहभाग होता.
पोलीस दलाच्या या तत्परतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून अशा बेकायदेशीर कृत्यांना आता अधिक कठोरपणे आळा बसणार आहे.