नांदेडसिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या तपास पथकाने आणि सायबर सेलच्या समन्वयाने एक उल्लेखनीय आणि जनतेच्या हितासाठी साकारलेली कामगिरी नुकतीच पार पडली. गुन्हेगारी तपासाच्या दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला एकूण ₹९,१३,०००/- किंमतीचा मुद्देमाल पुन्हा संबंधित तक्रारदारांना परत करण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली असून, पुणे पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे आणि सखोल तपास करत पोलिसांनी गुन्ह्यांतील जप्ती प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०३ श्री. संभाजी कदम यांच्या हस्ते हा मुद्देमाल अधिकृतरित्या फिर्यादींना परत करण्यात आला.
तपशीलवार मुद्देमाल खालीलप्रमाणे आहे:
गु.र.नं. ८८/२०२५: मार्बल दुकानातून चोरीस गेलेली ₹१,५८,०००/- ची रोख रक्कम.
गु.र.नं. ४९/२०२५: फिर्यादीच्या गळ्यातील ₹१,५०,०००/- चे मंगळसूत्र.
गु.र.नं. ११९/२०२५ व १२१/२०२५: ₹२५,०००/- किमतीच्या दोन मोटारसायकली.
प्रॉपर्टी मिसिंग प्रकरण: ₹२,००,०००/- किमतीचे एकूण १० मोबाईल फोन्स.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ श्री. संभाजी कदम, व सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही कामगिरी पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अतुल भोस
पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गुरुदत्त मोरे
सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव
पोलीस उपनिरीक्षक गजानन पोतदार
व तपास पथकातील कर्मचारी – विनोद भंडलकर, सुहास गायकवाड, अक्षय जाधव, रोशन मंडले, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, राजु वेंगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, भिमराज गागुर्डे, प्रतीक मोरे, संग्राम शिनगारे, सुदाम वावरे, सतिश खोत यांचा समावेश आहे.
पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण तपास पथकाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला असून, नागरिकांनी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या कार्यक्षमतेमुळे पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.