Home Breaking News नांदेडसिटी पोलिसांची यशस्वी कारवाई – रेकॉर्डवरील चोरटे जेरबंद; चोरीला गेलेल्या २ दुचाकी...

नांदेडसिटी पोलिसांची यशस्वी कारवाई – रेकॉर्डवरील चोरटे जेरबंद; चोरीला गेलेल्या २ दुचाकी जप्त

पुणे | नांदेडसिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या वाहनचोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठा घाव घालत, दोन दुचाकी चोरांना अटक करत ₹२५,०००/- किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली असून, रेकॉडवरील गुन्हेगार ओंकार सातपुते आणि साईराज तावरे यांना अटक करण्यात आली आहे.


तपास पथकाची शिताफीने केलेली कारवाई

या मोहिमेचा आराखडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तयार केला होता. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मोहन मिसाळ आणि शिवा क्षीरसागर यांना गोपनीय माहिती मिळाली की, धायरी परिसरात काही चोरटे चोरीच्या दुचाकींसह लपून बसले आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

 चौकशीत दोन गुन्ह्यांची कबुली

तपासादरम्यान आरोपींनी नांदेडसिटी पो.स्टे गु.र.नं. ११९/२०२५ व १२१/२०२५ (बीएनएस कलम ३०३ (२)) अंतर्गत गुन्ह्यांमध्ये दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून खालील वाहनं जप्त करण्यात आली:

हिरो स्प्लेंडर (MH-12 FQ 8387) – अंदाजे किंमत ₹10,000/-

हिरो स्प्लेंडर (MH-12 FQ 7355) – अंदाजे किंमत ₹15,000/-

 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात केलेली कारवाई

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त संभाजी कदम, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनात झाली. यामध्ये पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव यांच्यासह मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, राजु वेंगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेख कुलथे, भिमराज गागुर्डे, प्रतिक मोरे, अक्षय जाधव, संग्राम शिनगारे, सुदाम वावरे, सतिश खोत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 वाहनचोरांवर कडक नजर; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी पूर्वीही वाहनचोरीप्रकरणी अटक झालेले असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या त्यांच्याकडून अधिक चौकशी सुरू असून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नांदेडसिटी पोलिसांचा दणका – दुचाकी चोरी प्रकरणात रेकॉर्डवरील दोघांना अटक; दुचाकी जप्त