पुणे– देशभरात विविध रेल्वे स्थानकांची व शहरांची नावे बदलण्याच्या मोहिमेला वेग मिळत असतानाच, आता पुण्यातूनही अशाच एक ऐतिहासिक नाव बदलण्याची सशक्त मागणी पुढे आली आहे. भाजपच्या पुणे शहराच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक’ ठेवण्याची मागणी केली आहे.
खासदार कुलकर्णी यांनी सांगितले की, “पुण्याचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव जपण्यासाठी हे नाव अत्यंत योग्य ठरेल. बाजीराव पेशवे यांचे कार्य केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे.”
त्याचबरोबर त्यांनी स्थानकाच्या स्वच्छता, नागरी सुविधा आणि एकूणच सौंदर्यीकरणात सुधारणा करण्यावरही भर दिला आहे. “नामांतरासोबतच स्थानक अधिक आधुनिक, स्वच्छ आणि प्रवासी अनुकूल होणे गरजेचे आहे,” असे त्या म्हणाल्या.
नामांतराचा प्रस्ताव लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात लवकरच औपचारिक प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या धोरणानुसार याला अनुकूल प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. या नावबदलाच्या मागणीला पुणेकर नागरिक व इतिहासप्रेमींचा पाठिंबा मिळत असल्याचेही चित्र दिसते.
‘थोरले बाजीराव पेशवे’ – एक गौरवशाली वारसा थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे पराक्रमी सरसेनापती, युद्धकौशल्य, शौर्य आणि प्रशासन या सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुण्यातील प्रमुख रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव दिल्यास, हा महाराष्ट्राच्या इतिहासाला आदरांजली ठरेल, असे अनेकांचा विश्वास आहे.
विद्यमान नाव: पुणे रेल्वे जंक्शन सुचवलेले नाव: श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक मागणी करणाऱ्या: खासदार मेधा कुलकर्णी प्रस्ताव पाठवण्याची शक्यता: लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे