Home Breaking News ३० कोटींच्या कर्जप्रकरणात धक्कादायक फसवणूक! माजी आमदार संजय जगताप यांच्यासह कुटुंबाच्या बनावट...

३० कोटींच्या कर्जप्रकरणात धक्कादायक फसवणूक! माजी आमदार संजय जगताप यांच्यासह कुटुंबाच्या बनावट सह्या; बंगला जप्तीचा प्रयत्न उघड

66
0

पुणे– शहरात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये माजी आमदार संजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल ₹३० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. बनावट सह्या करून त्यांचं सिंध सोसायटीतील बंगला आणि सासवडमधील मालमत्ता जप्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात जगताप यांच्या पत्नी, आई, भाऊ आणि वहिनी यांच्या खोट्या सह्या करून कर्जाचे नूतनीकरण करण्यात आले, असा आरोप राजवर्धिनी जगताप यांनी तक्रारीत केला आहे. ही फसवणूक ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस तपास सुरू
तक्रार दाखल होताच सहाय्यक निरीक्षक अर्जुन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीकडून कर्ज वितरणाचे आणि बँक व्यवहारांचे दस्तऐवज मागवले, मात्र कंपनीकडून सतत टाळाटाळ केली जात आहे.

बनावट दस्तऐवजांवर मालमत्ता जप्तीचा प्रयत्न
कंपनी विलीन झाल्यानंतर नवीन कंपनीने (ऑथम इन्व्हेस्टमेंट) कर्ज न फेडल्याचे कारण देत जप्तीची नोटीस पाठवली. त्यामुळे जगताप कुटुंबाने सर्व कागदपत्रांची तांत्रिक तपासणी केली असता बनावट सह्या असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब समोर येताच फसवणुकीचा मोठा प्रकार उघड झाला आहे.

 नागरिकांमध्ये संताप आणि चिंता:
या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये मोठी चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर एका माजी आमदाराच्या कुटुंबासोबत अशी बनावट दस्तऐवजांवर फसवणूक होऊ शकते, तर सामान्य लोकांचे काय? यावर त्वरित कारवाई करून दोषींवर कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि राजकीय वर्तुळातून होत आहे.

प्रकरण: ३० कोटींची कर्जफसवणूक
ठिकाण: सिंध सोसायटी, पुणे व सासवड
तक्रारकर्ता: राजवर्धिनी जगताप
कर्जराशी: ₹30 कोटी
तपास: पुणे पोलिसांकडून सुरू