Home Breaking News रोल्स रॉयस ते रेंज रोव्हरपर्यंत… सावकार नानासाहेब गायकवाडच्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या पोलिसांच्या...

रोल्स रॉयस ते रेंज रोव्हरपर्यंत… सावकार नानासाहेब गायकवाडच्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या पोलिसांच्या ताब्यात! | ‘वैष्णवी हगवणे’ प्रकरणातील धक्कादायक गुन्हेगारीचा पर्दाफाश

पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरातील बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास जसजसा खोलात जात आहे, तसतसे अनेक दाढीखाली लपलेले गुन्हे उघडकीस येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आता सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड यांच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या आलिशान लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत.
 लक्झरी कार साम्राज्याचा भांडाफोड
नानासाहेब गायकवाड याच्या ताब्यातून पोलिसांनी रोल्स रॉयस, रेंज रोवर, मर्सिडीज, ऑडी, पजेरो, इनडेव्हर आणि लँड क्रूझर अशा एकापेक्षा एक महागड्या गाड्या जप्त केल्या. या सर्व गाड्यांवर ‘४४४४’ असा VIP नंबर होता, ज्यामुळे त्यांच्या आलिशानपणात भर पडते.

▪️ गाड्यांचे नंबर:

मर्सिडीज – JH 12 F 4444
रोल्स रॉयस – MH 12 RF 4444
रेंज रोव्हर – JH 10 K 4444
इनडेव्हर – MH 12 TH 4444
पजेरो – MH 12 HB 4444
ऑडी – MH 14 GY 4444
या गाड्या सध्या चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात उभ्या आहेत. या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत कोट्यवधी रुपये असून, त्यांच्या उत्पत्तीबाबत चौकशी सुरू आहे.

सावकारी, जमीन बळकावणे आणि गुन्हेगारी जाळं
गायकवाड कुटुंबियांनी अनेक नागरिकांच्या जमिनी बळकावून, व्याजाच्या आड लुबाडून मोठं आर्थिक साम्राज्य उभारलं. ‘मायावीनगर’ नावाने ओळखले जाणारे त्यांचे हे गुन्हेगारी आर्थिक जाळं अनेकांना उध्वस्त करून गेले आहे.
चार वर्षांपूर्वी दोघांवर मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नानासाहेब व गणेश गायकवाड यांना अटक करून कारागृहात पाठवले होते.
 आयपीएस सुपेकर यांच्यावर खंडणीचा आरोप
या प्रकरणात नवा वळण म्हणजे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गायकवाड पिता-पुत्रांकडून खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. सुपेकर यांचीही अडचण त्यामुळे वाढली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या तपासात त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.
 शशांक आणि लता हगवणे पुन्हा खेड न्यायालयात
जेसीबी विक्री फसवणूक व धमकी प्रकरणी अटकेत असलेले शशांक हगवणे व लता हगवणे यांना आज पुन्हा खेड न्यायालयात दुपारी ३ वाजता हजर करण्यात येणार आहे. महाळुंगे पोलिसांनी त्यांना अटक करून ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली होती, ती आज संपत आहे.
 निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याचा स्फोटक तपास
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला २०२२ मध्ये शस्त्र परवाना कसा मिळाला? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावेळी वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर पत्नीच्या तक्रारीनंतर गंभीर गुन्हा नोंद होता.
तरीसुद्धा मंत्रालयातून त्याला परवाना कसा मिळाला? कोणत्या अधिकाऱ्यांनी मदत केली? याचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली आहे.
 पोलिसांचं सखोल तपास आणि पुढील कारवाई
या प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहार, भूमाफिया कारवाया, खंडणी, फसवणूक आणि शासकीय प्रक्रियेचा दुरुपयोग असे सर्वच प्रकार उजेडात येत आहेत. पोलिसांचं लक्ष आता गायकवाड कुटुंबीयांच्या संपत्तीच्या मूळ स्रोतांवर आणि यामागील अधिकाऱ्यांच्या सहभागावर केंद्रित आहे.