पुणे – शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात असलेल्या भवे स्कूलजवळील नारायण साई टी स्टॉल परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता एक गंभीर अपघात घडला. एका टुरिस्ट कॅबचा चालक आणि त्याचा सहप्रवासी, हे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी वाहनावरील ताबा गमावून थेट चहा टपरीवर आणि तिथे उभ्या असलेल्या नागरिकांवर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सुमारे १२ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सदर कॅब चालवत असलेला चालक जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) याला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली. वाहनाचा मालक दिगंबर यादव शिंदे (वय २७) आणि सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) हेही पोलिसांच्या ताब्यात असून, सर्वांवर विश्रांबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वाहन चालक मद्यधुंद होता आणि त्याने वेगाने गाडी चालवत असताना चुकून अॅक्सेलरेटर जोरात दाबल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी त्याने चहा टपरीवर उभ्या असलेल्या नागरिकांवर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, काही दुचाकी वाहनेही गाडीखाली चिरडली गेली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती, आणि लोकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
1) किशोर हरिभाऊ भापकर वय 57 वर्षे
2) पायल आवेश कुमार दुर्गे वय 26 वर्षे
3) गुलनाज सिराज अहमद वय 23 वर्ष
4) सोनाली सुधाकर घोळवे वय 30 वर्ष
5) मंगेश आत्माराम सुरूसे वय 33 वर्षे
6) अमित अशोक गांधी वय 45 वर्षे
7) समीर श्रीपाद भालकीकर वय 45 वर्षे
8) सोमनाथ केशव मेरुकर व 28 वर्षे
9) प्रशांत ब्रह्मदेव बंडगर वय 30 वर्ष
10) अविनाश फाळके
11) प्रथमेश पतंगे
12)संदीप खोपडे
पोलिसांची तातडीने कारवाई:
विश्रांबाग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी पोहचले. पोलिसांकडून आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, मद्यपान केल्याची शक्यता असल्यामुळे त्यावरून गुन्हा दाखल केला जात आहे.
रुग्णालयांमध्ये सुरू आहे उपचार:






