पुणे शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एक अतिशय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा सायबर गुन्हा उघडकीस आणत, तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल येथून सापळा रचून अटक केली आहे.
हा सायबर गुन्हा पुण्यातील एका जेष्ठ नागरिकास **”डिजिटल अरेस्ट”**च्या नावाखाली घडवून आणण्यात आला होता. आरोपीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, व्हॉट्सअॅप कॉलद्वारे फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे, अशा बनावट चौकशीचे नाटक रचून, ९ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान, क्रमाक्रमाने ६ कोटी २९ लाख रुपये उकळले.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु. र. क्र. ८१५/२०२४ नोंदविण्यात आला असून, भारतीय दंड विधान कलम ३१८(४), ३१९(२), २०४, ६१(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासातील प्रमुख निष्कर्ष:
-
आरोपीने फिर्यादीकडून घेतलेली रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळती केली.
-
आरोपीच्या खात्यावरून ९० लाख व २० लाख रुपयांचे FD करण्यात आले होते.
-
संबंधित खाते “श्री धावीर कन्स्ट्रक्शन, कोकबन, ता. रोहा, जि. रायगड” येथे असल्याचे तपासात समोर आले.
-
आरोपी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८) हा बांधकाम व्यवसायिक असून तो पनवेलमधील ऐश्वर्या रिसॉर्ट परिसरात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली.





