Home Breaking News हिंजवडीमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प – IT कर्मचाऱ्यांची फडणवीस सरकारकडे ‘वर्क फ्रॉम...

हिंजवडीमध्ये मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प – IT कर्मचाऱ्यांची फडणवीस सरकारकडे ‘वर्क फ्रॉम होम’साठी मागणी

पुणे | हिंजवडी आयटी पार्क परिसरात मुसळधार पावसामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून, यामुळे हजारो IT कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रवासात अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर Forum for IT Employees (FITE) ने महाराष्ट्र सरकारकडे हिंजवडी परिसरातील IT कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) जाहीर करण्याची मागणी केली आहे.

वाहतूक कोंडीचे विदारक चित्र

FITE ने ट्विटरवर (सध्या X) एक व्हिडीओ शेअर करत पावसामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचे दृश्य दाखवले. या कोंडीत शेकडो वाहनं तासन्तास अडकून पडली असून, कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठण्यासाठी २-३ तासांचा अतिरिक्त वेळ लागत आहे.

 FITE ची थेट मागणी

FITE ने आपल्या पोस्टमध्ये सरकारकडे स्पष्ट शब्दांत विनंती केली की, “जर तुम्हाला खरंच IT कर्मचाऱ्यांची काळजी असेल, तर कृपया पावसाळा संपेपर्यंत आणि पावसाच्या दिवसांत हिंजवडी IT पार्कसाठी सक्तीचे वर्क फ्रॉम होम लागू करा.”

नागरिकांचा संताप, कर्मचारी त्रस्त

हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडत आहेत. या परिस्थितीत कार्यालय गाठणं कठीण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. काही जणांनी कंपनीकडे तसेच स्थानिक प्रशासनाकडेही तक्रारी केल्या आहेत.

 सरकारकडून उत्तराची अपेक्षा

FITE च्या या मागणीनंतर आता लक्ष वेधले जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे या मागणीवर काय उत्तर येते, याकडे आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचारी डोळे लावून आहेत.

,