Home Breaking News वाशी, नवी मुंबईत शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशी, नवी मुंबईत शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशी, नवी मुंबई | नवी मुंबईतील वाशी येथे आज पार पडलेल्या शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ या भव्य आयोजनास उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तरुणांनी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि पक्षनिष्ठा पाहता नवी मुंबईतील तरुण पिढी शिवसेनेच्या विचाराशी निष्ठावान असून संघटना बळकट करण्याची ताकद त्यांच्या अंगी असल्याचे स्पष्ट झाले.

मार्गदर्शनात ठाम मुद्दे मांडले गेले

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुढील महत्त्वाचे मुद्दे ठामपणे मांडण्यात आले:

  • शिवसेना बळकट करायची असेल तर युवा सेनेच्या माध्यमातून करावी लागेल. फक्त घोषणांवर नाही, तर कृतीत विश्वास ठेवणाऱ्या नव्या पिढीने आता थेट मैदानात उतरून सक्रिय योगदान द्यावे.

  • शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष सर्वसामान्य जनतेसाठी धडपडतोय आणि अनेक ठोस निर्णय घेतोय, याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

  • युवासेनेचा चेहरामोहरा आता बदलत चालला आहे. केवळ सभा, बाइक रॅली यात अडकून न राहता समाजात फरक घडवून आणणारी चळवळ तयार होत आहे.

  • राजकारण म्हणजे सत्तेची संधी नव्हे तर जनसेवेची संधी आहे, हे तरुणांनी ओळखावे आणि समाजासाठी व पक्षासाठी कार्यरत व्हावे.

  • प्रत्येक घरापर्यंत जाऊन शिवसेनेचे विचार पोहचवावेत. सोशल मिडियासोबतच प्रत्यक्ष जनसंपर्क हाही तितकाच महत्त्वाचा आहे.

  • येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात युवक आणि महिलांना सोबत घेऊन पक्ष सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढवावी.

  • पक्षासाठी प्रामाणिक, समर्पित आणि सातत्याने मेहनत करणाऱ्या तरुणांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तुम्हीही मेहनत घेतली तर वरच्या स्तरापर्यंत जाण्याची संधी नक्की मिळेल.

नवी पिढी, नवी राजकारणाची दिशा!

या संवाद मेळाव्यात नवी दिशा देणाऱ्या ‘नव्या राजकारणाची’ सुरुवात युवाशक्तीच्या जोरावर करायची आहे, हे ठामपणे सांगण्यात आले. शिवसेनेच्या विचारांचा प्रचार-प्रसार करून पक्षसंघटन अधिक बळकट करणे, जनतेच्या प्रश्नांना जवळून समजून घेऊन उपाययोजना करणे, आणि तरुणांच्या सहभागातून एक सक्षम महाराष्ट्र घडवणे, हा यामागचा उद्देश होता.

अनिकेत म्हात्रे यांची नवी जबाबदारी

या मेळाव्यात अनिकेत म्हात्रे यांची नवी मुंबई युवासेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या मेळाव्यात शिवसेना खासदार ना. नरेश म्हस्के, आमदार विजय शिवतारे, युवासेना कार्यकारी अध्यक्ष पुरवेश सरनाईक, उपनेते विजय नाहाटा, विजय चौघुले, पक्षप्रवक्ते राहुल लोढे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, किरण साळी यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने युवा सैनिक उपस्थित होते.