पुणे | १० मे २०२५ :- पुणे शहर गुन्हे शाखेने एकाच दिवशी दोन मोठ्या आणि उल्लेखनीय कारवाया करत गुन्हेगारी प्रवृत्तींना जबरदस्त धक्का दिला आहे. युनिट ५ आणि युनिट ६ यांनी केलेल्या या कामगिरीमुळे पोलिसांच्या सतर्कतेचा आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांना आला आहे.
विधीसंघर्षित बालकाकडून ५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस!
दि. ७ मे २०२५ रोजी युनिट ५ गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग दरम्यान एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडून ५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
या अल्पवयीन मुलाच्या चौकशीतून खालील गुन्ह्यांची कबुली मिळाली:
-
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ३५६/२०२५
-
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. २४७/२०२५
-
हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ४०७/२०२५
-
काळेपडळ पो.स्टे. गु.र.नं. ५०/२०२५
-
सिंहगड रोड पो.स्टे. गु.र.नं. २१४/२०२५
या प्रकरणांमध्ये एकूण १,८०,०००/- रुपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
ही कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पो.नि. वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
सहभागी अधिकारी व कर्मचारी:
सपोनि विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार राजस शेख, शहाजी काळे, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, विनोद शिवले, विनोद निंभोरे, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी मोरे, स्वाती तुपे, शुभांगी म्हाळसेकर.
वाळू माफियांवर युनिट ६ कडून धाडसी छापा – ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
याच दिवशी गुन्हे शाखा युनिट ६ ने अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर छापा टाकून सुमारे ३५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत थेऊर ते कोलवडी गावातील मुळा-मुठा नदी पात्रामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली.
शितोळे वस्ती येथे ट्रॅक्टर व पोकलँडसह आरोपी पंकज गायकवाड व त्याचे साथीदार ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेला मुद्देमाल:
-
२५ लाख रुपये किंमतीचे SANY कंपनीचे पोकलँड
-
५ लाख रुपये किंमतीचे सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली
-
५ लाख रुपये किंमतीचा महिंद्रा ट्रॅक्टर व ट्रॉली
-
४० हजार रुपये किंमतीची ८ ब्रास वाळू
एकूण जप्त मुद्देमाल – ₹३५,४०,०००/-
सदर इसमांवर लोणीकंद पो.स्टे. गु.र.नं. २१४/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) व खनिज कायदा १९५७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी पंकज गायकवाड याचा गुन्हेगारी इतिहास:
-
खून, डकैती, जबरी मारहाण, योजना आखणे, तडीपारी – असे गंभीर गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंद






