मुंबई : सैनिकी सज्जतेचा अनुभव, आपत्ती व्यवस्थापन कौशल्यांची तपासणी आणि आपातकालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांची तयारी वाढवण्याच्या उद्देशाने आज दुपारी ४ वाजता देशभरात एकाचवेळी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल राबवण्यात येणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांतील १६ ठिकाणी हे प्रशिक्षणात्मक सराव होणार आहे. १९७१ नंतर प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणावर होणारी ही मोहिम आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी गंभीरतेने सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुख्य ठिकाणे – मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये सराव:
या मॉक ड्रिलमध्ये खालील महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे:
उरण, तारापूर, रोहा-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थाळ, पिंपरी-चिंचवड, भुसावळ, मुंबई आणि पुणे. ही ठिकाणे धोका असलेली औद्योगिक किंवा सामरिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे मानली जातात.
४ वाजता काय होणार? नागरिकांनी काय करावे?
-
तपासणीसाठी सायरन वाजणार – सायंकाळी ४ वाजता दीर्घ आवाजाचा सायरन हे सराव सुरू झाल्याचे चिन्ह असेल.
-
ब्लॅकआउट प्रोटोकॉल – घरातील, कार्यालयातील, दुकाने, सार्वजनिक ठिकाणांतील सर्व दिवे बंद करावेत.
-
खिडक्यांपासून सावध रहा – कोणतेही उजेड बाहेर जाऊ नये म्हणून खिडक्यांना जाड पडदे किंवा कागद लावावेत.
-
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करावीत – मोबाईल, लॅपटॉप, टॅब यांचा वापर खिडकीजवळ टाळावा.
-
सुरक्षित भागात हलावे – ज्या खोलीत खिडक्या नाहीत किंवा सुरक्षा पुरेशी आहे अशा ठिकाणी संपूर्ण कुटुंबाने हलावे.
-
रेडिओ/टीव्ही सुरु ठेवा – अधिकृत घोषणा, सूचना रेडिओ व टीव्हीद्वारे मिळतील. अफवांवर विश्वास ठेवू नका.
-
गॅस आणि विद्युत उपकरणे बंद करावीत – आगीचा धोका टाळण्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे.
-
सुरक्षेचे साहित्य जवळ ठेवा – टॉर्च, ग्लो स्टिक, पाणी, ड्राय फूड, औषधे तयार ठेवा.
-
पालकांनी मुलांना समजावून सांगावे – ही एक सराव प्रक्रिया आहे, त्यामुळे घाबरू नये.






