आज ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धतेने शिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर साजरा करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक दिवशी विशेष गौरव
या समारंभात पोलीस दल, गृहरक्षक दल, होमगार्ड, नागरी सुरक्षा, येरवडा कारागृह पोलीस, अग्निशमन विभाग, वन विभाग आदींच्या एकूण १२ संचलन पथकांनी भव्य संचलन सादर केले. ऑस्कर नावाचा श्वान पथकातील श्वान, तसेच COPs-24, ११२ नंबर आपत्कालीन सेवा, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन, शासकीय रुग्णवाहिका, यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
मान्यवर उपस्थितीने वाढले कार्यक्रमाचे स्वरूप
समारंभाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये:
-
मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से), विभागीय आयुक्त, पुणे विभाग
-
मा. श्री. जितेंद्र डूडी (भा.प्र.से), जिल्हाधिकारी, पुणे
-
मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
-
मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
-
मा. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा)
-
मा. मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक (दळणवळण व आयटी विभाग)






