पुणे, १९ एप्रिल २०२५ –कात्रज चौकात उसाचा रस विक्रीच्या दुकानासमोरून चोरीस गेलेल्या यामाहा कंपनीच्या दुचाकीचा पर्दाफाश करत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत आरोपीला अटक करून चोरलेली गाडी जप्त केली आहे. हा प्रकार १६ एप्रिल रोजी घडला होता, आणि केवळ काही दिवसांत पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीला गजाआड केले.
दि. १६ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी यांनी त्यांची यामाहा कंपनीची दुचाकी गाडी कात्रज चौकात रस विक्रीच्या दुकानासमोर रस्त्याच्या कडेला लॉक करून उभी केली होती. काही वेळाने परत येताना त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. फिर्यादीने तात्काळ भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गु.र.नं. २१५/२०२५, भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि तपासाची दिशा
या चोरीच्या प्रकरणाची गंभीरता ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला तत्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांचे पथकाने विविध परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, खबऱ्यांमार्फत माहिती घेतली, आणि रेकॉर्डवरील चोरट्यांवर लक्ष केंद्रित केले.
सराईत आरोपी मिथुन लोखंडे पकडला
तपास दरम्यान, पोलिसांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत आरोपी मिथुन सुगंध लोखंडे (वय २२, रा. महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर) याने केला आहे. तपास पथकाने त्याला शिताफीने अटक केली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेली यामाहा दुचाकी हस्तगत केली.
पोलीस पथकाचे प्रभावी कामगिरी
ही यशस्वी कारवाई पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे – सौ. स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग – श्री. राहुल आवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पुढील पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोलाचा सहभाग होता:
-
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर
-
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे
-
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी
-
पोलीस अंमलदार: मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार





